Home गुन्हा खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात टँकरची झाडाला धडक

खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात टँकरची झाडाला धडक

0

टँकरची झाडाला धडक लागल्याची घटना नागपूर ते औरंगाबाद द्रूतगती मार्गावरील चांडस गावानजीक २१ सप्टेंबर रोजी रात्री दरम्यान घडली.

 वाशिम : रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकरची झाडाला धडक लागल्याची घटना नागपूर ते औरंगाबाद द्रूतगती मार्गावरील चांडस गावानजीक २१ सप्टेंबर रोजी रात्री दरम्यान घडली.
शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया नागपूर ते औरंगाबाद मार्गावरील चांडस गावानजीक मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्डे  चुकविण्याच्या प्रयत्नात या मार्गावर किरकोळ अपघात होत आहेत. २१ सप्टेंबर रोजी रात्री दरम्यान एमएच ४६  एफ ६००९ क्रमांकाचे टँकर मनमाडकडे जात होते. दरम्यान रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या पिंपळाच्या झाडाला टँकर धडकले. प्रसंगावधान राखून चालकाने वाहनातून उडी मारल्याने सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. चालक किरकोळ जखमी झाला असून, घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस स्टेशनचे बीट जमादार माणिक खानझोडे, शिपाई मनोज काकडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.