Home मनोरंजन खोटी स्क्रिप्ट अन बनावट कॉन्ट्रॅक्ट, अशी व्हायची राज कुंद्राच्या अश्लील व्हिडिओसाठीची कास्टिंग

खोटी स्क्रिप्ट अन बनावट कॉन्ट्रॅक्ट, अशी व्हायची राज कुंद्राच्या अश्लील व्हिडिओसाठीची कास्टिंग

0
खोटी स्क्रिप्ट अन बनावट कॉन्ट्रॅक्ट, अशी व्हायची राज कुंद्राच्या अश्लील व्हिडिओसाठीची कास्टिंग

[ad_1]

हायलाइट्स:

  • एकाच चित्रपटाची कथा दाखवून केली जाई फसवणूक
  • फसवून घेतली जायची करारावर सही
  • व्हिडीओ करण्यास नकार दिल्यास होत होती जबरदस्ती

मुंबई– अश्लील व्हिडीओ बनवणे आणि वेबसाइटवर प्रदर्शित केल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी रोज नवनवे खुलासे होत आहेत. काही काळापूर्वी राजचे काही व्हॉट्सअप चॅट पोलिसांच्या हाती लागले होते. त्यात कलाकारांना देण्यात येणाऱ्या मानधनाबद्दल आणि व्यवसायातून होणाऱ्या कमाईबद्दलचे पुरावे होते. आता व्हिडिओत काम करण्यापूर्वी कलाकारांना दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटाची स्क्रिप्ट आणि करार पोलिसांच्या हाती लागलं आहे.

राज कुंद्राच्या घराचं सर्व्हर आणि ७० पॉर्न व्हिडिओ जप्त

करारावर सही घेऊन केली जात होती जबरदस्ती

पोलिसांच्या हाती लागलेल्या करारामध्ये कोणत्याही कंपनी किंवा चित्रपटाचं नाव समाविष्ट नाही. या करारामध्ये केवळ कलाकाराची एका वेबसीरिजसाठी निवड झाल्याचं म्हटलं आहे. वेबसीरिजमध्ये काम करण्यापूर्वी कलाकारांकडून करारावर सही घेण्यात येत असे. जेव्हा एखादा कलाकार अश्लील सीन चित्रीत करण्यास नकार देई तेव्हा त्याच्यावर करार आणि पोलिसांची भीती दाखवून जबरदस्ती केली जाई.

AssignmentImage-1764174029-1626956160

अश्लिल व्हिडिओ निर्मिती प्रकरणात शिल्पाही सामील ?पोलिसांनी केला मोठा खुलासा

काय लिहिलं आहे करारामध्ये

या करारामध्ये म्हटल्यानुसार, तुम्हाला एका वेबसीरिजमध्ये काम करण्यासाठी निवडलं गेलं आहे. तुम्ही करारावर सही करताय याचा अर्थ वेबसीरिजच्या कथेसाठी चुंबनदृश्य, उत्तेजित करणारे सीन, नग्न सीन देण्यासाठी तुम्ही तयार आहात. हे सगळं तुम्ही स्वतःच्या मर्जीने करणार आहात. प्रोडक्शन हाऊस तुमच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करत नाही.

कशी होत होती फसवणूक

करार संपूर्णपणे इंग्रजी भाषेत असे. त्यामुळे प्रोडक्शन हाऊसमधील एक माणूस त्यांच्या पद्धतीने कराराचा अर्थ सांगत असे. कलाकाराला करारामध्ये लिहिलेल्या गोष्टीची कोणतीही पूर्वकल्पना दिली जात नसे. अशा प्रकारे नवीन कलाकारांची फसवणूक केली जात असे.

रोजची लाखोंची उलाढाल, अशा पद्धतीने खासगी खात्यात जायचा पैसा

चित्रपटाची खोटी कथा होती तयार

प्रत्येक नवीन येणाऱ्या कलाकाराच्या हाती एकाच चित्रपटाची कथा देण्यात येई. या स्क्रिप्टवर जय श्री राम लिहिलेलं असे. तर चित्रपटाचं नाव ‘धोका’ असं असे. प्रत्येक कलाकाराला एकच स्क्रिप्ट देऊन फसवणूक करण्यात येई.

AssignmentImage-414610216-1626956161

राज कुंद्रा प्रकरणात भडकला उमेश कामत, दिला कारवाईचा इशारा

[ad_2]

Source link