गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल आज; जिल्ह्याच्या राजकारणाला मिळणार कलाटणी?

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल आज; जिल्ह्याच्या राजकारणाला मिळणार कलाटणी?
- Advertisement -


हायलाइट्स:

  • जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागणार आहे.
  • रविवारी अत्यंत चुरशीने संघासाठी ९९ टक्के पेक्षा अधिक मतदान झाले होते. या निकालाने जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
  • मंगळवारी सकाळी कसबा बावडा येथील बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारपर्यंत निवडणुकीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

म . टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल आज मंगळवारी लागणार आहे. रविवारी अत्यंत चुरशीने संघासाठी ९९ टक्के पेक्षा अधिक मतदान झाले होते. या निकालाने जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. (The result of Gokul Dudh Sangh election will be announced today)

तीन मंत्री, दोन खासदार, अनेक आमदारांनी प्रचारात भाग घेतल्याने आणि सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे गोकुळची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकावर जोरदार आरोप आणि प्रत्यारोप केल्यामुळे या निवडणुकीत रंग भरला होता. रविवारी जिल्ह्यातील 70 केंद्रावर ईर्षेने मतदान झाले होते. 40 करोना बाधित रुग्णांनीही पीपीइ किट घालून मतदान केले होते.

मंगळवारी सकाळी कसबा बावडा येथील बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारपर्यंत निवडणुकीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर निकालानंतर जल्लोष करण्यास पोलिसांनी मनाई केली आहे. मतमोजणी केंद्रावर फक्त उमेदवार आणि मतमोजणी प्रतिनिधीनाच परवानगी असून मतदान मतमोजणी केंद्राबाहेरही कोणालाही येण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

क्लिक करा आणि वाचा- रेमडेसिवीर: सुजय विखेंचीही कोर्टात धाव; केला हा दावा, इतर नेतेही अडचणीत

जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून असलेल्या गोकुळच्या निकालाने जिल्ह्याच्या राजकारणाची नवी दिशा स्पष्ट होणार आहे. सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याविरोधात तीन मंत्री, दोन खासदार आणि अनेक आमदारांनी आघाडी केली होती. यामध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने यांचा समावेश आहे. आगामी लोकसभा, विधानसभा यासह अनेक स्थानिक स्वराज्य आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकीवर परिणाम करणारा गोकुळ चा निकाल असण्याची शक्यता आहे. यामुळे केवळ कोल्हापूर जिल्ह्याचे नवे तर पश्चिम महाराष्ट्राचे या निवडणुकीकडे निकालाकडे लक्ष लागले आहे.

क्लिक करा आणि वाचा- करोना: आज नव्या रुग्णांची संख्या ५० हजारांच्या खाली घसरली, मृत्यूही तुलनेने घटले
क्लिक करा आणि वाचा- नागपूर: नागरिकांचा पोलिसांवर हल्ला; तुफान दगडफेक, टोलीतील घटना



Source link

- Advertisement -