गोसीखुर्द जलाशयांच्या सर्वांगीण मत्स्यविकासासाठी प्रक्रिया, पॅकेजिंग व निर्यात सुविधांचा समावेश असलेला डीपीआर तयार करा – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. २५ : गोसीखुर्द जलाशय क्षेत्रातील मत्स्यव्यवसायाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रक्रिया, पॅकेजिंग आणि निर्यात सुविधांचा समावेश असलेला सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. आयुक्तांच्या माध्यमातून तातडीने पथक पाठवून जिल्हाधिकारी तसेच मत्स्यव्यवसाय, जलसंपदा व संबंधित विभागांच्या समन्वयाने एक ते दोन महिन्यांत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले.

    भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरण आणि मामा तलावांमध्ये मत्स्यपालनाला चालना देऊन स्थानिक मच्छीमारांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली.

    या बैठकीस आमदार नरेंद्र भोंडेकर, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे, भंडारा जिल्हाधिकारी (ऑनलाइन) तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    गोसीखुर्द जलाशय क्षेत्रात गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसायाची मोठी क्षमता आहे. या क्षेत्रात सध्या ११ सहकारी संस्था कार्यरत आहेत. मात्र, मोठ्या प्रकल्पासाठी आवश्यक भांडवल आणि तांत्रिक क्षमतेची गरज लक्षात घेऊन सर्व संस्थांना सहभागी करणारे सार्वजनिक-खासगी भागीदारीचे प्रारूप तयार करावे.

    या प्रारूपात सहकारी संस्थांना अग्रस्थानी ठेवून तांत्रिक व व्यावसायिक भागीदारांचे सहकार्य घेण्यात यावे. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांचे हक्क अबाधित ठेवून प्रकल्पासाठी आवश्यक गुंतवणूक आणि तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध होईल.

    डीपीआरमध्ये प्रकल्पासाठी आवश्यक जागा, निधी, मत्स्य प्रक्रिया व पॅकेजिंग केंद्र, निर्यात व्यवस्था आणि संबंधित विभागांच्या परवानग्यांचा समावेश राहणार आहे. या प्रकल्पामुळे मत्स्योत्पादन वाढविणे, अनधिकृत मासेमारीला आळा घालणे, शासनाचा महसूल वाढविणे आणि भविष्यात दहा हजार लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे शक्य होणार आहे.

    मत्स्य बाजारासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून ५ कोटी रुपयांपर्यंत निधी

    मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मत्स्य बाजार उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांपर्यंत निधी उपलब्ध आहे. परिसरातील तलावांची संख्या आणि मत्स्यव्यवसायाची क्षमता लक्षात घेता मत्स्य बाजार उभारणे आवश्यक आहे. या बाजारामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

    मत्स्यव्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे लाभ मच्छीमारांनाही मिळणार आहेत.

    मच्छीमारांसमोर पुढील वर्षासाठी मत्स्यखाद्य उपलब्ध करण्याचा प्रश्न

    - Advertisement -