घातक कोयते बाळगणाऱ्या दोघांना युनिट-१, गुन्हे शाखेकडून अटक

- Advertisement -

पुणे : परवेज शेख घातक कोयते बाळगणाऱ्या दोघांना
युनिट-१, गुन्हे शाखेकडून अटक
पुणे युनिट-१ चे पथक फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक अमोल पवार व वैभव स्वामी यांना बातमीदार तर्फे बातमी मिळाली की, दोन मुले हॉटेल देवीप्रसाद, गणेश पेठ येथे सार्वजनिक रोडवर बारदानासारख्या पोत्यात कोयते बाळगून उभे आहेत. त्यावरून त्यांनी दोन पंचांसह तिथे जाऊन छापा टाकला असता अभिषेक घारमळकर (वय २३, रा. बुधवार पेठ), राजेश उर्फ राजु नरसप्पा धनगर (वय २०, रा. लोहियानगर) हे संशयित मिळून आले.

त्यांची झडती घेतली असता त्यात दोन धारदार कोयते व १ हॉकी स्टिक मिळून आली. सदर आरोपींवर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून दोघांना पुढील कारवाईसाठी त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कोयत्यांबाबत चौकशी केली असता दोघांनी ८-१० दिवसांपूर्वी भांडणे झाली होती म्हणून कोयते बाळगल्याचे सांगितले. यात राजु नरसप्पा धनगर याच्यावर यापूर्वी खडक पोलिस स्टेशन येथे कोयता बाळगलेबाबत गुन्हा दाखल आहे.


सदरची कामगिरी गुन्हेचे अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चनसिंग, प्रतिबंधकचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरूण वायकर, उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, पोलीस कर्मचारी अजय थोरात, अमोल पवार, वैभव स्वामी, तुषार खडके, सुभाष पिंगळे यांनी केली आहे.

- Advertisement -