बुलढाणा, दि. १४ (जिमाका) : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात जन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात आले असून, आज सकाळी पारंपरिक पद्धतीने जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पुतळ्याला पंचामृताने अभिषेक करण्यात आला. तसेच एका बालकाला संभाजी महाराजांच्या रूपात पाळण्यात ठेवून सुवासिनींनी पाळणागीत गायले व त्याचे ‘संभाजीराजे’ असे नामकरण करण्यात आले. यानंतर केंद्रीय मंत्री जाधव यांनी स्मारकातील पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमास आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्षा पूजा गायकवाड, नगरपरिषदेचे गटनेते मृत्युंजय गायकवाड, ओमसिंग राजपूत, सोनू जाधव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000






















WhatsApp