छायाचित्र प्रदर्शनातून उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जीवनप्रवासाचे दर्शन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छायाचित्र प्रदर्शनातून उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जीवनप्रवासाचे दर्शन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- Advertisement -


मुंबई, दि. २१ : उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दादांचा संपूर्ण जीवनप्रवास सुंदरपणे उलगडला गेला आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची झलक यातून पाहायला मिळते. या छायाचित्र प्रदर्शनातून त्यांच्या संपूर्ण जीवनपटाचे दर्शन होत असून आपल्या सर्वांच्या मनात त्यांच्या स्मृती कायम राहतील अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीचे औचित्य साधून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘अजित स्मृती अविट स्मृती’ या  विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे आज उद्घाटन झाले. प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित दादांच्या आठवणींना उजाळा दिला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रदर्शनामुळे दादांच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. अजितदादांवर प्रेम करणाऱ्या आणि त्यांना मानणाऱ्या प्रत्येकाने हे छायाचित्र प्रदर्शन आवर्जून पाहावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. आमदार शिवाजीराव गर्जे, सतीश चव्हाण, चंद्रदीप नरके, गोकुळ शिंदे, हिरामण खोसकर, माजी आमदार राजेश पाटील, गोकुळ संघाचे माजी चेअरमन अरुण डोंगरे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

0000

निलेश तायडे/ विसंअ

 

 



Source link

- Advertisement -