जमिनीच्या वादातून नातेवाईक महिलेवर भर रस्त्यात वार; नागरिकांनी थांबवले असता बंदुक रोखून गोळ्या झाडण्याचा प्रयत्न*
पुणे : जमिनीच्या वादातून एका व्यक्तीने नातेवाईक महिलेवर भर रस्त्यावर वार केल्याची घटना महर्षी नगर परिसरात घडली आहे. वार करून आरोपी पळ काढण्याच्या तयारी असताना त्याला नागरिकांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्याने नागरिकांवर बंदुक रोखून गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार सुरु असतानाच आलम शेख या युवकाने स्वतःच्या जिवाची पर्वा नकरता बंदुक ओढून घेत आरोपीला पकडले आहे.
त्यानंतर सर्व नागरिकांनी आरोपीला पिस्तूलसह पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या घटने मुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान पोलिसांकडून आरोपीची चौकशी सूर असताना आरोपीचे चुलत भाऊ त्या ठिकणी आले. त्यावेळेस आरोपीने पोलिसांसमोरच “तुम्हाला सगळ्यांना संपविणार सोडणार नाही” अशी धमकी दिली आहे.