टेम्पो अन् दुचाकीच्या अपघातात, एक ठार 1 गंभीर जखमी

- Advertisement -

कल्याण : पत्रीपुलावरील वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त झाले  असतानाच पत्रीपुलावरुन पश्चिमेकडील रहेजा काँम्प्लेक्सकडे जाणाऱ्या रोडवर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी सातच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. कल्याण पूर्व येथून पत्रीपुलावरुन (पश्चिम) कडे येणाऱ्या रोडवर दोन दुचाकी, मोटारगाडी व माल वाहतूक टेम्पो, या तीन वाहनांचा अपघात झाला. त्यामध्ये एक दुचाकीस्वार ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. 

अपघातातील जखमी दुचाकी चालकाला कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात पत्रिपुलावरील वाहतूक कोंडी व रोडवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे झाला असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पत्रिपुलाचा प्रश्न कधी सुटणार, सत्ताधारी आणि प्रशासनाला कधी जाग येणार, की असेच आणखी बळी जाण्याची वाट सत्ताधारी पाहणार असा सवाल इतर वाहनचालक आणि प्रवाशी विचारत आहेत. 

- Advertisement -