Home गुन्हा तासा भरात ६० वाहनांवर विश्रांतवाडी पोलीस स्टेशनची कडक कारवाई

तासा भरात ६० वाहनांवर विश्रांतवाडी पोलीस स्टेशनची कडक कारवाई

0

पुणे प्रतिनिधी : पुणे शहर सील केले असताना विश्रांतवाडी पोलिस ठाण्यांतर्गत भैरवनगर आणि महाराणा प्रताप चौक , धानोरी परिसरातील सर्व रस्ते बंद करून परिसर सील करण्यात आलेला आहे. कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी देशभरात ३ मे पर्यंत ‘ लॉकडाऊन ‘ वाढविण्यात आले असल्यानंतरही विनाकारण घराबाहेर पडणारे चे प्रमाण कमी होताना दिसत नाही. याकरिता विश्रांतवाडी पोलिसांनी लॉकडाऊन च्या काळात ठिकाणी केलेल्या नाकाबंदी केली आहे. अशावेळी जवळपास एका तासाभरात ६० पेक्षा अधिक दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई करत वाहने जप्त केली आहेत.


विश्रांतवाडी पोलीसां कडून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. अशावेळी चोक बंदोबस्त राखण्यासाठी पुणे पी -४ चे समन्वयक व रिलायबल एच आर फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड चे राज राठोड , दिलीप सोनवणे ,अभिषेक महाडिक, दिनेश राईकवार यांचे सहकार्य लभले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक ( गुन्हे) रवींद्र कदम व पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते, सहकारी पथक विजय सावंत, विनायक रामाणे, यशवंत किरवे, प्रवीण भालचिम, किशोर दुशिंग ,अनिकेत भिंगारे ,प्रफुल मोरे, शेखर खराडे ,संदीप देवकाते तसेच विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील विशेष ठिकाणी नाकाबंदी व तळ ठोकून लक्ष ठेवून आहे.
यामुळे विनाकारण घराबाहेर फिरणारे यांची वाहने जप्त करण्यात आली आहे. पोलिसांकडून वारंवार सर्व नागरिकांना सूचना देण्यात येत आहे विनाकारण घरा बाहेर फिरू नका व प्रशासनाला सहकार्य करा.