दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त महाराष्ट्र सदनात कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त महाराष्ट्र सदनात कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ
- Advertisement -


नवी दिल्ली, दि. २१ : माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी कोपर्निकस मार्ग येथील महाराष्ट्र सदनात त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.

राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीचा दिवस दहशतवाद व हिसांचार विरोधी दिवस म्हणून ओळखला जातो. या निमित्ताने निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिसांचार विरोधी दिवसाची शपथ दिली.

या प्रसंगी विशेष आयुक्त श्वेता सिंघल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, जनसंपर्क अधिकारी मनिषा पिंगळे, निवासी उपअभियंता जमुनाप्रसाद गंगवार, व्यवस्थापक प्रमोद कोलपत्ते, सहायक लेखा अधिकारी निलेश केदारे तसेच महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.



Source link

- Advertisement -