हायलाइट्स:
- दीपिकाने आपल्या अतरंगी नवऱ्याला दिल्या हटके शुभेच्छा
- रणवीरच्या वाढदिवानिमित्त दीपिकाने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
- सोशल मीडियावर या दोघांचा व्हिडीओ झाला व्हायरल
काय आहे व्हिडीओत
या व्हिडीओमध्ये दीपिका आणि रणवीर ‘साड्डा कुत्ता कुत्ता’ या बोलांवर अतिशय मजेशीर डान्स करत आहेत. रणवीर आणि दीपिकाने एक्स्प्रेशन पाहण्यासारखे आहेत. केवळ इतकेच नाही तर आपल्या अतरंगी नवऱ्यासाठी दीपिकाने तितकीच अतरंगी पण प्रेमळ अशी पोस्ट लिहिली आहे.
हा व्हिडीओ शेअर करत दीपिकाने लिहिले की, ‘आज तुझा वाढदिवस आहे. त्यामुळे मी एक गोष्ट मान्य करते की त्वाडा कुत्ता टॉमी है और साडा कुत्ता कुत्ता है… माझ्या आयुष्यातील सर्वात प्रेमळ आणि आवडत्या व्यक्तीला जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.’ दीपिकाने शेअर केलेल्या या पोस्टवर त्या दोघांचे चाहते भरभरून कमेन्ट करत आहेत. त्यांच्या चाहत्यांना ‘दीप-वीर’चा हा अनोखा अंदाज खूपच आवडला आहे.
अशी आहे दीपिका रणवीरची लव्हस्टोरी
दीपिका आणि रणवीर पॉवर कपल म्हणून ओळखले जाते. या दोघांची लवस्टोरी देखील कमाल आहे. हे दोघेजण एकमेकांना खूप छान ओळखतात आणि एकमेकांचा खूप आदरही करतात. दीपिकाने तिच्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ‘जेव्हा रणवीरला ती भेटली होती तेव्हा आयुष्यात मी अनेक धक्के सहन केले होते. मी खूपच त्रासले होते. नातेसंबंधांवरील माझा विश्वास उडाला होता. त्यामुळे रणवीरबरोबरच्या रिलेशनसाठी मी मानसिकरित्या तयार नव्हते.’
रणवीर आणि दीपिकाची भेट ‘रामलीला’ सिनेमाच्या चित्रीकरणावेळी झाली होती. तेव्हा या दोघांमध्ये प्रेम फुलले. सिनेमाच्या सेटवरील प्रत्येकाला वाटत होते की ते एकमेकांच्या प्रेमात आहोत. ‘अंग लगा दे’ या गाण्यातून या दोघांमध्ये प्रेम असण्यावर शिक्कामोर्तब झाले. कारण या गाण्याचे चित्रीकरणावेळी रणवीर आणि दीपिका एकमेकांना किस करतात असा एक सीन होता. तो झाल्यानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी कट म्हटले तरी हे दोघे एकमेकांना किस करतच राहिले होते.
या दोघांची लवस्टोरी इतक्यावरच थांबली नाही. तर रामलीलाच्या टीम मधील एका व्यक्तीने सांगितले की, चित्रीकरण संपल्यानंतरही ते एकमेकांना बेबी म्हणून हाक मारायचे. ते दोघेजण सीन नसतील तेव्हा जास्तीत जास्त वेळ व्हॅनिटीमध्ये एकत्र घालवायचे. ते दोघेजण एकमेकांसोबत नवरा-बायकोसारखे रहायचे, हे सेटवरही सगळ्यांना आवडत होते. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१८ मध्ये ते लग्नबंधनात अडकले.
दीपिका आणि रणवीर हे बॉलिवूडमधील बेस्ट कपल मानले जाते. हे दोघेही यशाच्या शिखरावर आहेत. या दोघांची ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन केमेस्ट्री सर्वांनाच खूप आवडते. लग्नाआधी या दोघांनी रामलीला, पद्मावत, बाजीराव मस्तानी या सिनेमांत एकत्र काम केले होते. तर लग्नानंतर पहिल्यांदाच हे दोघेजण ’83’ या सिनेमांत एकत्र काम करताना दिसणार आहेत.