Home मनोरंजन दीपिका पादुकोणच्या कुटुंबाला करोनाचा विळखा, आई- वडिलांसह बहिणही पॉझिटिव्ह

दीपिका पादुकोणच्या कुटुंबाला करोनाचा विळखा, आई- वडिलांसह बहिणही पॉझिटिव्ह

0
दीपिका पादुकोणच्या कुटुंबाला करोनाचा विळखा, आई- वडिलांसह बहिणही पॉझिटिव्ह

[ad_1]

हायलाइट्स:

  • दीपिकाच्या आई- वडिलांसहित बहीणही करोना पॉझिटिव्ह
  • वडिलांची प्रकृती गंभीर वाटल्याने त्यांना केलं इस्पितळात भरती
  • आई- बहीण आहेत राहत्या घरी क्वारंटाइन

मुंबई– देशात करोनाचा कहर वाढत चालला आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक लोक आपले जीव गमावत आहेत. आरोग्य यंत्रणा संपूर्ण शक्तीनिशी काम करत आहेत. अशातही अनेक बॉलिवूड कलाकरांना करोनाची लागण झाली आहे. यावेळेस बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या संपूर्ण कुटुंबाला करोनाने विळखा घातला आहे. दीपिकाचं संपूर्ण कुटुंबच करोना पॉझिटिव्ह झालं आहे. दीपिकाच्या आईला आणि बहिणीला करोनाची लागण झाली आहे. तर वडिलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे.

ट्रोल होण्याच्या भीतीने जान्हवीने इन्स्टा फोटोवर दिलं स्पष्टीकरण

दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण हे माजी बॅडमिंटनपटू आहेत. दीपिकाच्या वडिलांसह तिची आई आणि बहीण अनिशाची तब्येत ठीक नसल्याने आणि त्यांना करोनाच्या सौम्य लक्षणांची जाणीव झाल्याने त्यांनी करोना चाचणी करून घेतली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तिघांनीही स्वतःला राहत्या घरी क्वारंटाइन करून घेतलं होतं. परंतु, काही दिवस उलटूनही प्रकाश यांचा ताप उतरला नाही तेव्हा त्यांना बंगळुरू मधील एका इस्पितळात भरती करावं लागलं. सध्या त्यांची तब्येत ठीक असल्याची माहिती समोर आली आहे. ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.

AssignmentImage-947882081-1620131088

प्रकाश ६५ वर्षाचे असून त्यांनी १९८० साली बँडमिंटनमध्ये संपूर्ण जगातून पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळवलं होतं. १९७२ साली त्यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. महाराष्ट्रात लॉकडाउन होण्यापूर्वी दीपिका आणि रणवीर बंगळुरूला आले होते. यापूर्वीही काही बॉलिवूड कलाकारांना करोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमार, भूमि पेडनेकर, कार्तिक आर्यन, गोविंदा, तारा सुतारिया, कटरीना कैफ, विक्की कौशल यांसारख्या अनेक कलाकारांना करोनाची लागण झाली आहे.

३० हजार सिनेकामगारांना दिलासा; यश राज फिल्म्स देणार मोफत लस

[ad_2]

Source link