धक्कादायक! नवी मुंबईत महिलेला जाळण्याचा प्रयत्न; गळफास देऊन हत्या

- Advertisement -

नवी मुंबई: वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये महिलेवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याची घटना ताजी असताना आता नवी मुंबईत एका महिलेला जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. महिलेला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्यानंतर पाच आरोपींनी तिला गळफास लावला. त्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या पोलीस पाच फरार आरोपींचा शोध घेत आहेत. 

नवी मुंबईतल्या पनवेलमधील दुंद्रे गावात एका महिलेला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. चोरीच्या आरोपावरुन हा प्रकार घडला. मृत महिलेवर शेजारच्यांनी काही दिवसांपूर्वी मंगळसूत्र चोरीचा आरोप केला होता. त्यावरुन मोठा वादही झाला होता. त्यानंतर हे प्रकरण मिटलं होतं. यानंतर आज सकाळी शेजारच्यांनी महिलेच्या घरात घुसून तिला पेटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिला गळफास लावून लटकवण्यात आलं. यात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

- Advertisement -