Home क्रीडा धोनीला भाजपकडून झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर ?

धोनीला भाजपकडून झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर ?

 भारताचा माजी कर्णधार, विद्यमान यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी हे लवकरच क्रिकेट मधून निवृत्ती घेऊन भाजपात प्रवेश करणार असल्याचे माजी केंद्रीय मंत्री संजय पासवान यांनी म्हटले आहे.

पासवान यांनी ‘दीर्घ कालावधीपासून आमची धोनीशी चर्चा सुरु आहे. मात्र याबाबतचा निर्णय त्याच्या निवृत्तीनंतरच होईल. धोनी माझ्या परिचयातील आहे. त्याला पक्षात सहभागी करुन घेण्यासाठी माझे प्रयत्न आहेत अस विधान केले आहे. तसेच या वर्षाच्या अखेरीस धोनी रहिवासी असलेल्या झारखंडमध्ये विधासनभा निवडणुका होणार आहेत. त्याआधीच धोनीचा भाजपप्रवेश होईल आणि त्याला मुख्यमंत्रिपदासारखी मोठी ऑफरही दिली जाईल, असंही बोललं जात आहे.

दरम्यान अमित शहा यांनी पक्षाच्या संपर्क फार्म समर्थन अभियानांतर्गत महेंद्रसिंह धोनीची भेट घेतली होती. आणि आता पासवान यांच्या या वक्तव्यनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.