नवाबपूर येथील महावितरणचे ३३ केव्हीचे उपकेंद्र सुरु – पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन

- Advertisement -


  •  ६०० कृषी ग्राहकांना मिळणार योग्य दाबाचा वीजपुरवठा

यवतमाळ, दि. ४ : नेर तालुक्यातील नवाबपूर येथील महावितरणचे ३३/११ केव्हीचे उपकेंद्र कार्यान्वित झाले असून गुरुवारी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेल्या पाच कोटींच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या उपकेंद्रामुळे परिसरातील सुमारे ६०० कृषी वीज ग्राहकांना लाभ मिळणार आहे.

यापूर्वी बानगाव, चिचगाव, फत्तेपूर व उदापूर या गावांमधील कृषी पंपांची संख्या आणि विद्युत भार वाढल्यामुळे शिरजगाव उपकेंद्रावर मोठ्या प्रमाणात भार निर्माण झाला होता. परिणामी या गावांमधील कृषी ग्राहकांना अपेक्षित व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळण्यात अडचणी निर्माण होत होत्या.

नवाबपूर उपकेंद्र कार्यान्वित झाल्यामुळे शिरजगाव उपकेंद्रावरील अतिरिक्त भार कमी होऊन बानगाव, चिचगाव, फत्तेपूर व उदापूर या गावांना अधिक स्थिर व योग्य दाबाचा वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. याचा थेट लाभ या परिसरातील सुमारे ६०० कृषी वीज ग्राहकांना मिळणार आहे.

पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून ५ कोटींचा निधी

या नवाबपूर उपकेंद्रासाठी २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या माध्यमातून ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, पालकमंत्र्यांच्या विशेष पुढाकारातून हे महत्त्वपूर्ण काम पूर्णत्वास आले आहे.

नवाबपूर उपकेंद्र सुरू झाल्यामुळे परिसरातील कृषी ग्राहकांना वीजपुरवठ्याच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा होऊन शेतीसाठी आवश्यक असलेला योग्य दाबाचा आणि अधिक विश्वासार्ह वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बानगाव, चिचगाव, फत्तेपूर व उदापूर परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पालकमंत्र्यांच्या तातडीच्या निर्देशानुसार महावितरण प्रशासनाने नवाबपूर उपकेंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याच्या कामाला प्राधान्य दिले असून, २४ तासांत उपकेंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही वेगाने करण्यात येत आहे. पालकमंत्र्यांच्या भेटीदरम्यान महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000000



Source link

- Advertisement -