प्रादेशिक पर्यटन आराखड्यातील कामे गतीने पूर्ण करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

- Advertisement -


सातारा दि. ४: जिल्ह्यात प्रादेशिक पर्यटन अराखड्यातील कामांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या आराखड्यातील कामे मुदतीत व गुणवत्तापूर्ण करावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

प्रादेशिक पर्यटन आराखड्यातील सुरु असलेल्या कामांचा पालकमंत्री देसाई यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, उपवन संरक्षक अमोल सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रादेशिक पर्यटन आराखड्यातील सुरू असलेली कामे गतीने पूर्ण करावीत. ही कामे पूर्ण झाल्यामुळे जिल्ह्यात स्थानिकांना रोजगाच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच पर्यटकांची संख्या ही वाढणार आहे. आराखड्यातील कामे वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वयाने करून ही कामे येत्या मार्चपर्यंत पूर्ण करावीत. जल पर्यटन कामेही तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी केल्या.
००००



Source link

- Advertisement -