मुंबई: भाऊ कदम.. फक्त नाव जरी घेतलं तरी मराठी प्रेक्षकांना हसायला येतं. आपल्या अभिनयानं, विनोदी बुद्धीनं प्रेक्षकांना हसवणाऱ्या भाऊ कदमचा म्हणजेच अभिनेते भालचंद्र पांडुरंग कदम . त्यांचा चाहता वर्गही मोठा आहे. असाच एक जबरा फॅन नुकताच
भाऊ कदम यांना भेटला होता. त्याच्यासोबतचा फोटो भाऊ कदम यांनी शेअर केला आहे.
भाऊ कदम यांनी सोशल मीडियावर या चाहत्यासोबतचा फोटो शेअक करत पोस्ट शेअर केली आहे. ‘आज बाहेर कामासाठी गेलो असता, रस्त्यात खेड शिवापूरच्या एक पेट्रोल पंपावर एक फॅन भेटला… आणि त्याच प्रेम पाहून त्याच्यासोबत एक फोटो काढण्याचा मोह मला काही आवरला नाही…त्याने चक्क त्याच्या हातावर माझं नाव गोंदवलेलं… रंगभूमीमुळे मिळालेलं हे प्रेम मला असचं चांगलं काम करण्याची प्रेरणा देत राहिल…धन्यवाद मित्रा’, असं भाऊ कदम यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
काही दिवसांपूर्वी कोविड सेंटरला दिली होती भेट
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील कोविड केअर सेंटरमध्ये भाऊ कदम यांनी भेट दिली होती. ते आल्यानंतर कोविड सेंटरमध्ये आल्यानंतर सगळ्यांचेच चेहरे खुलले. भाऊ कदम यांनी यावेळी धीराचे चार शब्द बोलून सर्वांचीच मने जिंकली. भाऊचा मालवणीतील आपुलकीचा संवाद सर्वांनाच भावला.
Source link