हायलाइट्स:
- नुसरत जहांच्या प्रेग्नन्सीवर उपस्थित होतंय प्रश्नचिन्ह
- नुसरत जहांच्या प्रेग्नन्सीबद्दल नवरा निखिल जैनला काहीच नाही माहीत
- लेखिका तस्लिमा नसरीन यांची नुसरतच्या प्रेग्नन्सीसंदर्भातील पोस्ट चर्चेत
तस्लिमा नसरीन यांनी त्याच्या फेसबुकवर नुसरत संदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यानी नुसरतला पती निखिल जैनपासून घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला आहे. तस्लिमा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘नुसरतच्या प्रेग्नन्सीचं वृत्त चर्चेत आहे. पण याबाबत तिचा पती निखिलला मात्र काहीच माहीत नाही. मागच्या सहा महिन्यांपासून दोघंही वेगळे राहत आहेत आणि नुसरत अभिनेता यश दासगुप्ताच्या प्रेमात आहे.’
लेखिका तस्लिमा नसरीन यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं, ‘लोकांना वाटतं की, नुसरतच्या बाळाचा बाप निखिल नाही तर यश आहे. हे सत्य आहे की, अफवा हे माहीत नाही पण जर असच चालत राहिलं तर मला वाटतं नुसरतनं निखिलला घटस्फोट द्यायला हवा. वटवाघूळाप्रमाणे कोणत्याही अस्थिर नात्यात लटकट राहण्याचा काही फायदा नाही. यामुळे दोघांनाही त्रास होणार आहे. जेव्हा नुसरत- निखिलचं लग्न झालं तेव्हा आनंद झाला होता कारण मी सांप्रदायिकतेवर विश्वास ठेवते. जेव्हा दोन वेगवेगळ्या धर्मांमधील लोकांचं लग्न होतं तेव्हा स्वाभाविकपणे मी खुश होते.’
तस्लिमा लिहितात, ‘जाती, धर्म यांची बंधन झुंगारुन द्यायची असतील तर दोन वेगवेगळ्या धर्मातील किंवा जातीतील व्यक्तींना एका नात्यात एकत्र बांधले गेले पाहिजे. ज्यामुळे हिंसा कमी होईल. असं माझं मत आहे. पण ही गोड जोडी जास्त दिवस एकमेकांसोबत आनंदी राहणार नाही हे त्यावेळी कोणाला माहीत होतं. त्यादिवशी मी नुसरतचा एक फोटो पाहिला ती एंजेलिना जोलीसारखीच सुंदर दिसते. उत्तम अभिनय करते आणि निश्चितच ती स्वतंत्र आहे. जर तुम्ही स्वतंत्र आणि जागरुक आहात, तुमच्याकडे आत्मविश्वास आणि स्वाभिमान आहे तर निश्चितच तुम्ही तुमच्या बाळाचं संगोपन उत्तमरित्या करू शकता.’
दरम्यान २०१९ मध्ये नुसरत जहां आणि निखिल जैन यांनी टर्कीमध्ये लग्न केलं होतं. या दोघांचा लग्नसोहळा मोठ्या धूमधडाक्यात पार पडला होता. त्यानंतर सोशल मीडियावरही या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण मागच्या सहा महिन्यांपासून या दोघांमध्ये वाद सुरू असल्याचं बोललं जात आहे. तसेच नुसरतचं अभिनेता यश दासगुप्ता याच्याशी अफेअर असल्याचं बोललं जात आहे. अर्थात यावर यशनं आम्ही दोघं फक्त प्रोफेशनल पार्टनर असल्याचं म्हटलं होतं.