परभणी जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करा  – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद

परभणी जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करा  – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद
- Advertisement -

परभणी जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करा  – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद

 मुंबई, दि.७ : परभणी जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत  अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

मुंबईतील ‘निर्मल भवन’ येथील एम.एस.आर.डी.सी.कार्यालयात परभणी जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत कामाच्या आढावा बैठकीत ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता अजय सिंग यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, गंगाखेड, जिंतूर, मानवत, पालम, परभणी, पाथरी, पूर्णा, सेलु, सोनपेठ येथील जल जीवन मिशनच्या सर्व योजनांची कामे गतीने पूर्ण करावीत. पालम व गंगाखेड तालुक्यातील टंचाई निवारणार्थ विशेष दुरूस्ती कामे प्राधान्याने करावी. वस्सा, चारठाणा, पिंपळगाव, काजळी तांडा येथील कामे पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

०००

संध्या गरवारे/विसंअ

- Advertisement -