नागपूर, ५ जुलै : विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात बाबूरावजी तिडके यांनी उत्तम काम करून अनेकांना प्रेरणा दिली, त्यांच्या निधनाने एक उमदे व्यक्तिमत्व आपल्यातून हरवले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस शोकसंदेशात म्हणतात की, ज्येष्ठ काँग्रेस नेते बाबूरावजी तिडके यांचा ८५ वा वाढदिवस अलीकडेच मार्च महिन्यात आयोजित करण्यात आला होता. त्या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहून मी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी नागपूर जिल्ह्यातील राजकारणाला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. शिक्षण तसेच सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. राजकारणात व समाजकारणात आज सक्रिय असलेल्या नागपूर जिल्ह्यातील अनेकांची राजकीय जडणघडण बाबूरावजींच्या मार्गदर्शनात झाली होती. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
000






















WhatsApp