Home ताज्या बातम्या पीटर आहेत जगातील पहिले सायबोर्ग

पीटर आहेत जगातील पहिले सायबोर्ग

0

पीटर आहेत जगातील पहिले सायबोर्ग
मासपेशींच्या गंभीर आजाराशी लढणारे ब्रिटनचे वैज्ञानिक डॉ. पीटर स्कॉट मॉर्गन हे आता मनुष्यातून सायबोर्गमध्ये बदलण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. 

सायबोर्ग म्हणजे असा रोबोट ज्यामध्ये मनुष्याचा मेंदू आणि काही भाग कार्य करत असतात. पीटर याना मोटर न्युरॉन डिसीज आहे. या आजारामध्ये रूग्णाच्या मांसपेशी काम करणे हळूहळू बंद करतात. आता पीटर स्वतःला पूर्णपणे सायबोर्गमध्ये बदलण्यास तयार आहेत.

डॉ. पीटर यांच्या शरीरातील तीन भागांमध्ये यंत्र लावलेले आहेत. यासाठी अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आहेत. ऑपरेशनद्वारे त्यांच्या जेवणाच्या ट्यूबला थेट त्यांच्या पोटाशी जोडले. तसेच मुत्र साफ होण्यासाठी आणि मल बाहेर पडण्यासाठी देखील ऑपरेशन करण्यात आलेले आहे.

त्यांच्या चेहऱ्याला आकार देणारी शस्त्रक्रिया देखील करण्यात आलेली असून त्यांचा चेहरा पूर्णपणे रोबोटिक झाला आहे. त्यांचा मेंदू ऑर्टिफिशियल इंटेलिजेंसशी जोडण्यात आला व आवाज देखील बदलण्यात आला आहे.