Home ताज्या बातम्या पुणे स्मार्ट सिटी अ‍ॅडव्हायजरी फोरमची बैठक संपन्न

पुणे स्मार्ट सिटी अ‍ॅडव्हायजरी फोरमची बैठक संपन्न

0

पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली पुणे स्मार्ट सिटी अ‍ॅडव्हायजरी फोरमची तिसरी बैठक मंगळवारी पार पडली.
यावेळी खासदार वंदना चव्हाण, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, सुनील टिंगरे, सभागृहनेते धीरज घाटे, दिलीप बराटे आणि पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल व इतर अधिकारी उपस्थित होते.

सीईओ रुबल अग्रवाल यांनी पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांबाबतचे नियोजन व सद्यस्थिती याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी औंध-बाणेर-बालेवाडी परिसरात क्षेत्र आधारित विकास प्रकल्प, तसेच संपूर्ण शहर पातळीवर राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची माहिती देण्यात आली.

रस्ते, प्लेसमेकिंग आणि माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित प्रकल्पांना गती देण्याच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करण्यात येईल असे श्रीमती अग्रवाल यांनी सांगितले.
तसेच, अ‍ॅडव्हायजरी फोरमची बैठक यापुढे दर तीन महिन्यांनी नियमितपणे आयोजित करण्यात येईल, असे सीईओ श्रीमती अग्रवाल यांनी सांगितले.