Home ताज्या बातम्या पुण्यातील चिनी प्रवाशाचा अहवाल आला निगेटिव्ह

पुण्यातील चिनी प्रवाशाचा अहवाल आला निगेटिव्ह

0

पुणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर पुणे येथील नायडू मध्ये निरिक्षणाखाली असलेल्या चिनी प्रवाशासह आणखी 5 जणांचे नमुने करोना निगेटिव्ह आले आहेत. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्या 35 पैकी 30 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आतापर्यंत 35 जणांना भरती करण्यात आले आहे. यामध्ये कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या मूळच्या केरळमधील आणि वुहान शहरात वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या 2 विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या दोघांना कोणतीही लक्षणे नसली तरी खबरदारी म्हणून त्यांना भरती करून प्रयोगशाळा तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत भरती करण्यात आलेल्या 35 पैकी 30 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन आय व्ही पुणे यांनी दिला आहे. नायडू रुग्णालयात भरती करण्यात आलेला चिनी प्रवासी देखील करोना आजारा करिता निगेटिव्ह आढळला आहे. जिल्हा रुग्णालय, अहमदनगर येथे निरीक्षणाखाली असलेला प्रवासीही करोना करता निगेटिव्ह आढळला आहे . उरलेल्या 5 जणांचे अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होतील. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 140 प्रवाशांपैकी 57 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.