Home ताज्या बातम्या पुण्यात धक्कादायक!! रस्त्यावरील फालूदा खाताना त्यामध्ये निघालं धारधार ब्लेड

पुण्यात धक्कादायक!! रस्त्यावरील फालूदा खाताना त्यामध्ये निघालं धारधार ब्लेड

0

पुण्यात धक्कादायक!! रस्त्यावरील फालूदा खाताना त्यामध्ये निघालं धारधार ब्लेड

पुण्यात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. पुण्यातील रस्त्यावर असणाऱ्या फालूदा विक्रेत्याकडून फालूदा घेणं चांगलंच महागात पडलं आहे. हा रस्त्यावरील फालूदा खात असताना त्यामध्ये धारधार ब्लेड दिसल्याने
या व्यक्तीने पोलिसात तक्रार नोंदवली आहे. हा व्यक्ती पुण्यातील एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. पुण्यात रस्त्यावरील फालूदा विक्रेत्याकडून फालूदा विकत घेतल्यानंतर त्यात ब्लेड निघालं मात्र, या व्यक्तीला कोणतीही इजा झाली नाही.

पुण्यातील पिंपळे सौदागर या भागात हा प्रकार घडला. सॉफ्टवेअर इंजिनिअर असणाऱ्या मनोज सुरेश आहुजा आणि त्याच्या पत्नीने एका फालूदा विक्रेत्याकडून फालूदा घेतला. हा फालूदा खाताना त्याच्या फालूद्यात टोकदार असलेली धारधार वस्तू तोंडात लागली. ही वस्तू तोंडातून बाहेर काढली असता ती वस्तू ब्लेड असल्याचे लक्षात आले.
यावेळी सॉफ्टवेअर इंजिनिअर असणाऱ्या मनोज सुरेश आहुजा यांनी थेट सांगवी पोलीस ठाणे गाठून त्या विक्रेत्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारी नंतर फालूदा विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली. मात्र त्याला जामिनावर सोडून दिले.