Home शहरे पेरणी करताना विजेच्या धक्क्याने बैलासह शेतकऱ्याचा मृत्यू; पोराला साहेब करायचं स्वप्न अधुरं.

पेरणी करताना विजेच्या धक्क्याने बैलासह शेतकऱ्याचा मृत्यू; पोराला साहेब करायचं स्वप्न अधुरं.

उस्मानाबाद : राज्यभर पावसाला सुरवात झाली आहे. पावसाने हजेरी लावल्यामुळे पेरणीची लगबग सुरू आहे. उस्मानाबादेत पेरणी करताना विजेचा शॉक लागून बैलासह शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातील बोर्डा गावातील रामेश्वर मनोहर शेळके या शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. पेरणी सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत बैलासह शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

शेतात उभ्या असलेल्या विजेच्या खांबाला तारेचा आधार असतो. त्यामध्ये करंट उतरला होता. पेरणी सुरू असताना बैलाचा खांबाच्या तारेला स्पर्श झाला. यावेळी बैलाला वाचवण्यासाठी गेले असता, बैलासह त्यांचा मृत्यू झाला.

मुलाला खुप शिकवून साहेब करायचं अशी रामेश्वर यांची ईच्छा होती. मात्र या दुर्घटनेमुळे मुलाला साहेब करण्याचं त्यांचं स्वप्न अधुरच राहिलं.