Home ताज्या बातम्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे रिक्षात विसरलेला मोबाईल पुन्हा मिळून आला

पोलिसांच्या सतर्कतेमुळे रिक्षात विसरलेला मोबाईल पुन्हा मिळून आला

0

परवेज शेख दि.19/01 रोजी मिठगंज पोलीस चौकी अंमलदार ड्युटीवर असताना सुमारे 19:30 वाजण्याच्या सुमारास इसम नामे सिराजुद्दीन अमिरुद्दीन शेख वय 65 राहणार 1075 न्यू नाना पेठ पुणे यांनी समक्ष येऊन कळविले की मी रिक्षा चालक असून माझ्या रिक्षा मध्ये ऐक प्रवासी महिला तिचा मोबाइल रिक्षा मध्ये विसरून गेली आहे असे सांगून लेनोवा कंपनीचा मोबाईल हजर केला . मिठगंज मार्शल वरील कर्मचारी पो शी भोसले,पो शी खरात असे मिळून सदर ठिकाणाला भेट देऊन आजूबाजूला चौकशी करून मोबाईल मधून नंबर वर संपर्क केला असता सदर मोबाईल महिला नामे वसुधा सुधीर थोरात वय 40 राहणार 492 गुरुवार पेठ पुणे यांचा असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर महिलेला संपर्क साधून मोबाईल बाबत माहिती दिली असता सदर महिला चौकीत आल्या सदर मोबाईल फोन बाबत खात्री करून मोबाइल फोन महिला नामे वसुधा थोरात यांना परत केला त्यांनी पोलिसांचे सदर कामगिरीमुळे आभार व्यक्त केले आहे तसेच रिक्षा चालक यांचे सुद्धा आभार मानले


सदरची कामगिरी पो नाईक बारवकर ,पो शी खरात, पो शी भोसले यांनी केली आहे.