पोलिसालाच ब्लेकमेल करणा-या महाठकांना केले अटक

- Advertisement -

पुणे : परवेज शेख पोलिसालाच ब्लेकमेल करणा-या महाठकांना बेड्या. चिंचवड: चक्क पोलिसालाच ब्लेकमेल करणा-या महाठकांना बेड्या पडल्या,पोलीस शिपाई संदीप दादु कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार चिंचवड येथील शिवाजी चौकात १९ नोव्हेंबरला सायंकाळी सव्वा सहा वाजता घडला. रवींद्र भागवत सातपुते (रा़ हनुमाननगर, बारामती) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार विजय कोकरे (रा. बाणेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,संदीप कांबळे हे चिंचवड वाहतूक शाखेत नेमणूकीला आहेत. ते मंगळवारी सायंकाळी शिवाजी चौकात असताना रवींद्र सातपुते व विजय कोकरे तेथे आले व त्यांनी चौकात संदीप कांबळे यांचे व्हिडिओ व फोटो काढले व त्या आधारावर ते कांबळे यांना ब्लेकमेल करीत होते.

- Advertisement -