Home शहरे जळगाव प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना व शासकीय योजनांचा तालुकास्तरीय मेळावा एरंडोल येथे संपन्न

प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना व शासकीय योजनांचा तालुकास्तरीय मेळावा एरंडोल येथे संपन्न

0

एरंडोल, प्रतिनिधी – येथे दि. १८ फेब्रुवारी २०२० रोजी मुद्रा बँक योजना समन्वय समितीतर्फे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पोलीस स्टेशन मैदान याठिकाणी तालुकास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमेशसिंह परदेशी, प्रमुख पाहुणे तहसीलदार अर्चना खेतमाळीस, बी. डी.ओ. बी.एस.अकलाडे, मुख्याधिकारी किरण देशमुख, लेखाधिकारी जिल्हा नियोजन समिती कैलास सोनार. जिल्हा केंद्राचे व्यवस्थापक सुनील पाटील, उपनगराध्यक्ष ॲड. नितीन महाजन व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.
मेळाव्यात उपस्थित बचत गटांच्या महिला, तंत्रनिकेतन मधील शिक्षण घेणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी, व्यापारी यांना मार्गदर्शन करताना अर्चना खेतमाळीस यांनी सांगितले सरकारी नोकरीच्या मागे न लागता काही उद्योग व्यवसाय किंवा तांत्रिक शिक्षण घेऊन आपला स्वतःचा उद्योग अशा योजनांच्या लाभ घेऊन उभा करावा, बचत गटांच्या महिलांनी अशा योजनांचा लाभ घेऊन नाना प्रकारचे उद्योग करून स्वावलंबी जीवन जगावे. अध्यक्षीय भाषणात रमेश परदेशी यांनी नगरपालिका तर्फे ज्या योजना राबवल्या जातात या योजनांच्या लाभार्थ्यांना नगरपालिकेतर्फे पूर्ण सहकार्य दिले जाईल व त्या काळात त्या कामासाठी सर्व बँकांनी सुद्धा सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती राणे यांनी तर आभार कैलास सोनार यांनी मानले.
फोटो ओळी – मेळाव्याचे उद्घाटन करतांना बी.डी.ओ.बी.एस.अकलाडे सोबत नगराध्यक्ष रमेश परदेशी,नितीन महाजन आदी.