Home अश्रेणीबद्ध फुटबॉलमध्ये झालाय आजवरचा सर्वात मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; पाहा व्हिडिओ

फुटबॉलमध्ये झालाय आजवरचा सर्वात मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; पाहा व्हिडिओ

0
फुटबॉलमध्ये झालाय आजवरचा सर्वात मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; पाहा व्हिडिओ

चेल्टहॅनम: न्यूपोर्ट काउंटी फुटबॉल क्लबचा गोलकिपर टॉम किंग (Tom King)ने आजवरचा सर्वात लांबून गोल करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. टॉमने चेल्टहॅनमविरुद्धच्या सामन्यात हा पराक्रम केला. टॉम किंगकडून करण्यात आलाला हा गोल फुटबॉल इतिहासातील आजवरचा सर्वात लांब गोल (longest goal ever) ठरला आहे.

वाचा- रोहित शर्मा झाला भावनिक; सोशल मीडियावर शेअर केली ही पोस्ट

जॉनी-रॉक्स स्टेडियम (Jonny-Rocks Stadium) वर मंगळवारी झालेल्या या सामन्यात २५ वर्षीय गोलकिपर टॉमने आपल्या पोस्टमधून थेट प्रतिस्पर्धा संगाच्या गोलपोस्टमध्ये बॉल मारला. टॉम किंगने मारलेली किक चेल्टहॅनमचा गोलकिपर जोश ग्रिफिथच्या डोक्यावरून जाळ्यात गेली. किंगने मारलेला चेंडूने ९६.०१ मीटर इतके अंतर पार केले. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. किंगने अम्मीर बेगोविक (Asmir Begovic)चा विक्रम मागे टाकला. त्याने स्टोक संघाकडून खेळताना नोव्हेंबर २०१३ साली ९१.०९ मीटर इतक्या लांब अंतरावरून गोल केला होता.

वाचा- तुम्ही इतके वाइट खेळला की दुय्यम संघाने पराभव केला; ऑस्ट्रेलिया संघाला घरचा आहेर

वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याने मी आनंदी आहे. मी याची कल्पना देखील केली नव्हती. माझ्या यशाबद्दल गर्व वाटतो. ही गोष्ट बरीच वर्ष लोकांच्या लक्षात राहिल, असे टॉम किंगने विक्रमानंतर म्हटले.

वाचा- भारताच्या ‘अजिंक्य’ कर्णधाराचे अख्या सोसायटीने केले जंगी स्वागत; पाहा व्हिडिओ

गिनेज वर्ल्ड रेकॉर्डने (Guinness World Records) देखील प्रतिस्पर्धा फुटबॉल सामन्यात झालाला हा सर्वात लांग गोल ठरल्याचे म्हटले आहे.

Source link