Home मनोरंजन फुल्ल एण्टरटेनमेन्ट! मे महिन्यात ओटीटीवर रिलीज होणार धमाकेदार चित्रपट आणि वेब सीरिज

फुल्ल एण्टरटेनमेन्ट! मे महिन्यात ओटीटीवर रिलीज होणार धमाकेदार चित्रपट आणि वेब सीरिज

0
फुल्ल एण्टरटेनमेन्ट! मे महिन्यात ओटीटीवर रिलीज होणार धमाकेदार चित्रपट आणि वेब सीरिज

[ad_1]

मुंबई: करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशाचं प्रचंड नुकसान झालं आहे. अनेकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. बॉलिवूडसुद्धा या व्हायरसच्या कचाट्यातून सुटलेलं नाही. अनेक चित्रपटांचं शूटिंग झालेलं असतानाही ते अद्याप रिलीज झालेले नाही. मध्यंतरीच्या काळात काही काळासाठी चित्रपटगृह सुरू करण्यात आली होती मात्र करोनाची दुसरी लाट आल्यानंतर ती पुन्हा बंद करण्यात आली आहेत. पण असं असलं तरी या महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर मात्र मनोरंजनाचा धमाका पाहायला मिळाणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत्या महिन्याभरात अनेक चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत.

राधे
सलमान खान आणि दिशा पाटनी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट येत्या १३ मे ला रिलीज होणार आहे. दुबईमध्ये आणि भारतात हा चित्रपट एकाच वेळी रिलीज होणार असून दुबईमध्ये तिकिटांची एडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. याशिवाय सलमान खानचा हा चित्रपट ‘झी ५’च्या ‘पे पर व्ह्यू’ची सर्व्हिस झीप्लेक्स वर रिलीज होणार आहे. याशिवाय सर्व प्रमुख डीटीएच ऑपरेटर म्हणजे डिश, डी2एच, टाटा स्काय आणि एयरटेल डिजिटल यावरही हा चित्रपट पाहता येणार आहे.

तूफान
अभिनेता फरहान अख्तरचा बहुचर्चित चित्रपट ‘तूफान’ करोनामुळे चित्रपटगृहांमध्ये नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. येत्या २१ मे ला हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात फरहान एका गुंडाची भूमिका साकारत आहे. जो राष्ट्रीय स्तरावर बॉक्सर होण्यापर्यंत प्रवास करतो. या चित्रपटात मृणाल ठाकुर, परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर आणि हुसैन दलाल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

लावा का ढावा
होस्ट आणि अभिनेता जावेद जाफरी यांचा शो ‘लावा का ढावा’ येत्या ५ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. हा एक गेम शो आहे.

रामयुग
दिग्दर्शक कुणाल कोहली यांची आगामी वेब सीरिज रामयुग येत्या ६ मे ला रिलीज होणार आहे. ही वेब सीरिज रामायणावर आधारित आहे. या वेब सीरिजमध्ये दिगंथ मनचले, अक्षय डोगरा, ऐश्वर्या ओझा, कबीर दूहन सिंह, विवान भटेना, नवदीप पल्लापोलू, अनीश जॉन कोकेन, शिशिर मोहन शर्मा, जतिन सियाल, श्वेता गुलाटी, सुपर्णा मारवाह, ममता वर्मा, टिस्का चोपड़ा, दलीप ताहिल आणि अनूप सोनी यांच्या भूमिका आहेत.

[ad_2]

Source link