Home गुन्हा बंद घर फोडून चोरट्याने घरातील २ लाख ६७ हजार ७५० रुपयांचा

बंद घर फोडून चोरट्याने घरातील २ लाख ६७ हजार ७५० रुपयांचा

0

परवेज शेख पुणे दि ०६ :- औंध येथील बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने घरातील २ लाख ६७ हजार ७५० रुपयांचा ऐवज लांबविला. दरम्यान, चतुर्श्रुंगी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी श्‍वान पथकाला पाचारण केले आहे. दिलीप फातरफोड , वय – ७५ वर्षे , रा औंध पुणे असे घर मालकाचे नाव आहे. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत ही चोरीची घटना घडली आहे.


दि. १ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी  दरम्यान २६० , फ्लॅट नं . ०२ , पहीला मजला अंकिता अपार्टमेंट , गणेशबाग , पंजाब नॅशनल बँकेचे मागे , औंध , पुणे  यातील फिर्यादी यांचा राहता फ्लॅट कुलुप लावुन बंद असताना ,ते आपल्या घरी परत आले असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले व कडी- कोयंडा उचकटलेला दिसून आला. त्यामुळे दिलीप फातरफोड , घरात जाऊन सर्व साहित्य सुरक्षित आहे का. याची पाहणी केली. यावेळी त्यांना घरातील बेडरूम मधील कपाटातील ५० युरो , ५० डॉलर , पासपोर्ट , व व सोन्याचे दागिने असा एकुण २ लाख ६७ हजार ७५० रु . गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.त्यांनतर दिलीप फातरफोड यांनी तात्काळ याबाबतची खबर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व पाहणी केली. चतुर्श्रुंगी पोलिसांनी याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून चोरट्याला पकडण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. व पुढील तपास उप . निरी .मोहनदास जाधव करीत आहे

SHIFA MOBILE 9028293338