बजेटमध्ये महिलांना मिळू शकतात 3 मोठ्या सवलती, तयार झाला प्लॅन

- Advertisement -

मुंबई : येत्या 5 जुलैला मोदी सरकार पूर्ण बजेट सादर करतेय. यात नोकरी करणाऱ्या महिलांना करात सवलत मिळू शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामण महिलांना हा दिलासा देऊ शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार शैक्षणिक कर्जाच्या व्याजावर कर सवलतीच्या वेळेचा निर्बंध दूर करू शकतात. मुलांच्या संगोपनावरच्या वाढत्या खर्चासंबंधीही दिलासा मिळू शकतो.

सूत्रांच्या म्हणण्याप्रमाणे बजेटमध्ये महिलांना कर सवलतीची भेट मिळू शकते. नोकदार महिलांच्या मुलांच्या पाळणाघराच्या फीवर कर सवलत मिळण्याची शक्यता आहे. पाळणाघराच्या फीवर कर सवलत 7500 रुपयापर्यंत मिळू शकते. ही कर सवलत जास्तीत जास्त 2 मुलांच्या कर सवलतीवर देण्याचा विचार केला जातोय.

महिलांना बँकेकडून मिळणाऱ्या 40 हजार रुपयापर्यंतच्या व्याजावर कर नाही

मोदी सरकारनं अंतरिम बजेटमध्ये घोषणा केली होती, महिलांना बँकेकडून मिळणाऱ्या 40 हजार रुपयापर्यंतच्या व्याजावर कर आकारला जाणार नाही. महिलेला बँकेकडून 40 हजार रुपये व्याज मिळत असेल तर त्यावर TDS लागणार नाही.

अंतरिम बजेटमध्ये महिलांना मिळाली भेट

अंतरिम बजेटमध्ये सरकारनं गरोदर महिलांसाठी मातृ योजनेची घोषणा केली. यानुसार महिलांना 26 आठवड्यांची सुट्टी मिळेल, असं जाहीर केलं होतं. सरकारनं कामगाराच्या मृत्यूनंतर 2.5 लाख रुपये भरपाई मिळण्याऐवजी आता 6 लाख रुपये देण्याची घोषणा केली. याशिवाय ग्रॅज्युटीची मर्यादा 10 लाखापेक्षा वाढवून 20 लाख रुपये केली.

शिवाय मोदी सरकार 5 जुलैला सादर होणाऱ्या बजेटमध्ये सर्वसामान्यांना मोठा दिलासा देऊ शकतं. CNBC आवाजला मिळालेल्या एक्स्लुझिव माहितीनुसार सरकार LNG आयात स्वस्त करण्यासाठी इम्पोर्ट ड्युटीमध्ये कपात करू शकते. यामुळे CNG PNG च्या किमती कमी होतील. सरकार याची घोषणा बजेटमध्ये करू शकते. ड्युटी कमी झाल्यानं पाॅवर आणि फर्टिलायझर क्षेत्राला फायदा होईल. LNG स्वस्त झाल्यानं CNG च्या किमती कमी होणार. कारच्या इंधनाचा खर्च कमी होणार. शिवाय पाइपमधून घरात पोचणारा PNGही स्वस्त होईल. त्यामुळे जेवण बनवणं स्वस्त होईल.

- Advertisement -