हायलाइट्स:
- बाबांवर झालेल्या मी टू च्या आरोपांमुळे व्यथित झाले होते
- माझे वडिल कसे आहेत, ते मला पूर्ण माहिती आहेत.
- नकारात्मक विचार, नकारात्मक लोकांपासून बाबांनी मला कायमच लांब ठेवलंय
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आलियाने तिची ही मते मांडली आहेत. या मुलाखतीमध्ये आलिया म्हणाली, ‘ जे लोक माझ्या वडिलांना जवळून ओळखतात त्यांच्यासाठी ते एखाद्या ‘टेडी बियर’ प्रमाणे गोंडस आहेत. परंतु जेव्हा मी टू (#Me Too) मोहिमेत माझ्या वडिलांवर आरोप झाले तेव्हा मी खूपच तणावात होते. या आरोपांमुळे त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाल्याने त्या काळात मी खूपच अस्वस्थ झाले होते.’ आलिया या मुलाखतीमध्ये पुढे म्हणाली, ‘ माझ्या वडिलांना जे नीट ओळखत नाहीत ते माझ्या वडिलांना वाईट व्यक्ती म्हणायचे.परंतु माझ्या जवळचे लोकांसाठी ते अतिशय सहृदयी आहेत. माझ्या वडिलांनी मला नकारात्मक, चिंताजनक गोष्टींपासून, विचारांपासून नेहमीच लांब ठेवले. कारण त्यांना माहिती होते की अशा विचारांच्या व्यक्ती आयुष्यात काहीच करू शकत नाहीत. परंतु या काळात या व्यक्ती, हे विचार माझ्या आसपास होते. परंतु त्या विचारांना आणि व्यक्तींना मी लांबच ठेवले होते. ‘
फादर्स डेच्या निमित्ताने आलियाने अनुराग कश्यपसोबत केलेला ब्लॉगमुळे ती खूपच चर्चेत आली होती. या ब्लॉगमध्ये आलियाने वडिलांना, अनुरागला काही बिंधास्त प्रश्न विचारले की, तुमच्या मुलीने ती गरदोर आहे, असे तुम्हांला सांगितले तर तुम्ही कसे व्यक्त व्हाल?’ त्यावर अनुराग म्हणाला होता की, ‘ मला तिच्याकडूनही काही अपेक्षा आहे. परंतु ती जे काही करेल त्यात मी तिच्यासोबत असेल. तिला आयुष्यात जे हवे असेल ते साध्य करण्यासाठी काही किंमत चुकवावी लागते, परंतु तरी देखील मी तिच्यासोबत कायम असेन…’