भरती परीक्षा संदर्भातील टास्क फोर्सचा नाशिक येथे ३० सप्टेंबर रोजी संवाद – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. २९ : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत करण्यात आलेला उच्चस्तरीय टास्क फोर्स बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी घटकांशी जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे संवाद साधणार आहे.

    परीक्षा प्रक्रियेतील अडचणी, सूचना आणि अभिप्राय जाणून घेऊन त्याआधारे आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी करण्यात येणार आहेत. भरती परीक्षांशी संबंधित उमेदवार, संस्था तसेच इतर संबंधित घटकांना आपल्या सूचना व अभिप्राय टास्क फोर्सकडे नाशिक विभागासाठी nashik-examreformstaskforce @maharashtra.gov.in या ई-मेलवर अभिप्राय देता येईल.

    उच्चस्तरीय टास्क फोर्सने यापूर्वी १२ सप्टेंबर रोजी पुणे, १६ सप्टेंबर रोजी नागपूर आणि १७ सप्टेंबर रोजी अमरावती आणि २१ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर,२९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे संबंधित घटकांशी संवाद साधला आहे. या विभागांमधून प्राप्त झालेल्या सूचना व अभिप्रायांचा अभ्यास करून भरती परीक्षा प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक बाबींचा विचार केला जाणार आहे.

    विभागनिहाय संवादातून प्राप्त सूचनांच्या आधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे आणि परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी टास्क फोर्स शासनास शिफारशी सादर करणार आहे.

    ०००००

    एकनाथ पोवार/ससं

     

     

     

     

    - Advertisement -