हायलाइट्स:
- भाजप आज ओबीसींसाठी रस्त्यावर
- भाजपकडून चक्का जाम आंदोलन
- ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत
आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच, मुंबईतही भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर, आमदार आशिष शेलार आणि मनोज कोटक यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. औरंगाबाद येथेही भाजपच्या चक्का जाम आंदोलनावेळी पोलिसांनी महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष उमा खापरे, खासदार डॉ भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्या सह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
वाचाः ‘खडसे, मुंडे, तावडे या बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हेही सांगा’
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात पुण्यातील कात्रज चौकात आंदोलन होत आहे. यावेळी ‘ओबीसींच्या पाठीशी भाजप खंबीर उभा असून आरक्षण लागू होईपर्यंत निवडणूका होऊ देणार नाही,’ असा इशाराच पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात दाभोळकर कॉर्नर येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. भाजपनं केलेल्या आंदोलनामुळं काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
वाचाः ‘मुख्यमंत्री महाराष्ट्राला बंदीराष्ट्र बनवतायेत; रोजीरोटीचा झगडा पुन्हा सुरू’
वाचाः अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार? दोन स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटक