Home गुन्हा भाजपचे माजीआमदार नरेंद्र मेहता यांच्या वर बलात्काराचा गुन्हा दाखल

भाजपचे माजीआमदार नरेंद्र मेहता यांच्या वर बलात्काराचा गुन्हा दाखल

0

ठाणे , प्रतिनिधी – शफीक शेख : भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेतील भाजपच्याच एका नगरसेविकेनं नरेंद्र मेहता यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. तशी तक्रारही त्यांनी कोकण महानिरीक्षकांकडं केली होती. त्याची दखल घेऊन मीरा-भाईंदर पोलिसांनी गुरुवारी रात्री ३ वाजून ३५ मिनिटांनी मेहता यांच्या विरोधात लैंगिक अत्याचार आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा प्रमाणे गुन्हा दाखल. आईपीसी कलम 376 (2) ,376 (2),496, 417, 232, 504, 506, 34, तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार कायदा 3(1)(w), अनुसूचित जाती अनुसूचित जमाती 3(s), अनुसूचित जाती अनुसूचित जमाती कायदा 3(2)(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

नरेंद्र मेहता यांच्यापासून माझ्या संपूर्ण कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे. मेहता यांनी अनेक महिलांचं शोषण केल्याचा आरोपही या नगरसेविकेनं केला आहे. पीडित नगरसेविकेनं याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडंही तक्रार केली होती. मात्र, त्याकडं दुर्लक्ष केलं गेल्याचं त्यांचं म्हणणं होतं. पक्षाकडून न्याय न मिळल्यानं अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली होती.

मेहता यांच्यावरील आरोपांवरून महाविकास आघाडी सरकारनंही विधिमंडळात भाजपला घेरलं होतं. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी स्वत: हा मुद्दा उचलला होता. त्यामुळं भाजपची मोठी कोंडी झाली होती.