Home ताज्या बातम्या भाजपाला आक्रोश आंदोलन पडलं महागात, १०० हून अधिक कार्यकर्त्यांवर कारवाईचे आदेश

भाजपाला आक्रोश आंदोलन पडलं महागात, १०० हून अधिक कार्यकर्त्यांवर कारवाईचे आदेश

0
भाजपाला आक्रोश आंदोलन पडलं महागात, १०० हून अधिक कार्यकर्त्यांवर कारवाईचे आदेश

हायलाइट्स:

  • ओबीसी राजकीय आरक्षण रद्द केल्यामुळे ठाकरे सरकारचा निषेध
  • भाजपचं बुलढाण्यामध्ये आंदोलन
  • परवानगी नसल्याने कारवाई आदेश

बुलडाणा : भारतीय जनता पक्षाच्यावतीने ओबीसी राजकीय आरक्षण रद्द केल्याबद्दल महाविकास आघाडीचा निषेध करण्यासाठी आज बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले आहे. मात्र, या आंदोलनास कोणतीच परवानगी नसल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना हे आंदोलन चांगलच महागात पडलं आहे. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे आदेश अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांनी दिले आहेत.

यावेळी आंदोलनात भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे, योगेंद्र गोडे, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा सिंधुताई खेडेकर यांच्यासह जवळपास १०० पदाधिकारी हजर होते. जिल्हाधिकारी कार्यलयासमोर गर्दी करून कोविडच्या धर्तीवर कुठलीही परवानगी नसताना भाजपच्यावतीने कोविड नियमाचे उल्लंघन करीत सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली.

यामुळे या आंदोलनावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांनी शहर पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झाल्यानंतर भाजपने ठाकरे सरकारला धारेवर धरलं. आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असा वाद सध्या राज्यात पेटला आहे.

Monsoon : केरळमध्ये मान्सूनची दमदार हजेरी, ‘या’ तारखेला महाराष्ट्रात होणार दाखल

दरम्यान, ओबीसी आरक्षणावरून भाजपने जळगावातही आंदोलन केलं होतं. यावेळी भाजप नेते गिरीश महाजन यांनी ठाकरे सरकावर टीका केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणाऱ्या राजकीय आरक्षणासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने ओबीसींना मिळणारे अतिरिक्त राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. या मुद्द्यावरून भाजपाकडून ठाकरे सरकारच्या निषेधार्थ जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आक्रोश आंदोलन करण्यात आलं होतं.

भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी या आंदोलनाचं नेतृत्त्व केलं होतं. यावेळी आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापालिका स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Source link