Home गुन्हा भावाच्या पत्नीला शिवीगाळ केल्या प्रकरणी जाब विचारन्यास गेलेल्यावर चाकूने वार

भावाच्या पत्नीला शिवीगाळ केल्या प्रकरणी जाब विचारन्यास गेलेल्यावर चाकूने वार

0

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) रमेश कांबळे
भावाच्या पत्नीला शिवीगाळ केल्या प्रकरणी जाब विचारन्यास गेलेल्यावर चाकूने वार करून जखमी केले. ही घटना (शनिवारी दि.२ )सकाळी साडेनऊच्या सुमारास गांधीनगर, देहूरोड येथे घडली. या प्रकरणी अकबर महेबूब शेख (वय 35, रा. गांधीनगर, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शाकीर ईदायत (रा. शितळानगर, देहूरोड) याच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या प्रमाणे , आरोपी शाकिर ईदायत आणि फिर्यादी अकबर शेख यांच्या भावाच्या पत्नी ,यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद विवाद झाला. बाचाबाचीत आरोपीने, फिर्यादी यांच्या भावाच्या पत्नीस शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्या प्रकरणी , जाब विचारण्यासाठी फिर्यादी गेले असता, ‘तू आमच्या भांडणात का आलास?’ असे म्हणत आरोपीने फिर्यादी यांच्यावर, काही कळायच्या आतच , चाकूने वार केले. यामध्ये फिर्यादी जखमी झाले. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.