हायलाइट्स:
- विचारमग्न सागरचे फोटो तुषार भामरेने केले होते सोशल मीडियावर पोस्ट
- सागर सोशल मीडियावर एका रात्रीत बनला सिलेंडर मॅन
- प्रवीण तरडेने दिलं मराठी चित्रपटात भूमिका देण्याचं आश्वासन
अरेच्चा! अनेक मराठी मालिकांमध्ये सुरू आहे सध्या ‘हा’ एकंच ट्रॅक, तुम्हाला समजलं का?
सागरचे फोटो सर्वप्रथम सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या तुषार भामरेने एका वृत्तवाहिनीसोबत संवाद साधला. त्यावेळेस तुषारने सागरबद्दल अनेक गोष्टीचा उलगडा केला. तुषारच्या म्हणण्यानुसार, सागर त्याला पहिल्यांदा दिसला तेव्हा तुषार त्याच्या पत्नीसोबत चष्मा खरेदी करण्यासाठी गेला होता. सिलेंडरच्या गाडीजवळ विचारमग्न अवस्थेत उभ्या असलेल्या सागरचे तुषारने दोन फोटो काढले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले. खरं तर, सागरचा लुक तुषारलाही आवडला होता. सागरचे फोटो पोस्ट करताना तुषारच्या हे ध्यानीमनी देखील नव्हतं की सागर रातोरात स्टार होईल.
तुषारने सांगितल्याप्रमाणे, सागरला मिळालेल्या लोकप्रियतेनंतर तुषारने सागरशी संपर्क साधला. सर्वप्रथम तुषारने त्याचे फोटो न विचारता सोशल मीडियावर टाकल्याबद्दल सागरची माफी मागितली. उलट सागरने मात्र तुषारचे आभारच मानले. अचानक मिळणाऱ्या लोकप्रियतेमुळे सागर भारावून गेला होता. सागरला प्रवीण यांनी त्यांच्या आगामी चित्रपटात संधी देण्याचं आश्वासन दिलं आहे, असं तुषारने सांगितलं. यानंतर सागरच्या दिसण्यामुळे तो मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही झळकला तर नवल वाटायला नको.
अंबरनाथमधला गॅसवाला वेब सीरिज, मालिकेत दिसला तर नवल वाटायला नको!