Home ताज्या बातम्या मंदीत संधी! वरळीत चार फ्लॅटची तब्बल सव्वाशे कोटींना खरेदी

मंदीत संधी! वरळीत चार फ्लॅटची तब्बल सव्वाशे कोटींना खरेदी

0
मंदीत संधी! वरळीत चार फ्लॅटची तब्बल सव्वाशे कोटींना खरेदी

म. टा. प्रतिनिधी

वरळी : रिअल इस्टेट क्षेत्र वास्तवात मंदीत आहे. पण मुद्रांक शुल्कातील सवलतीचा फायदा मोठ्या खरेदीदारांनी नेमका घेतल्याचे मुंबईत दिसून आले आहे. याअंतर्गतच एकाच कुटुंबीयाने चार फ्लॅटपोटी तब्बल सव्वाशे कोटी रुपये मोजल्याचे समोर आले आहे. ‘सीआरई मॅट्रिक्स’ या सर्वेक्षण संस्थेने ‘महाराष्ट्र टाइम्स’ला ही माहिती दिली.

करोना संकटात रिअल इस्टेटला बळ देण्यासाठी राज्य सरकारने डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कात ३ टक्के व मार्चपर्यंत २ टक्के सवलत दिली होती. याच सवलतीत वरळीतील रहेजा आर्टेशिया या टोलजंग टॉवरमध्ये दालमिया कुटुंबीयांनी जवळपास साडे सहा हजार चौरस फूट जागेपोटी १२४.९० कोटी रुपये मोजले. हा खरेदी करार जून महिन्यात पूर्णत्वास आला. पण त्यापोटी मुद्रांक शुल्क नोंदणी ३१ मार्चला करण्यात आली. त्यामुळे खरेदीदारांना दोन टक्के सवलत मिळाली.

पहिली खरेदी नताशा दालमिया यांनी ३३व्या मजल्यावरील ३३०२ व ३३०३ फ्लॅटपोटी केली. या प्रत्येक फ्लॅटचे चटई क्षेत्र ३७०२ चौरस फूट आहे. हा प्रत्येक फ्लॅट ३४.८७ कोटी रुपये किमतीचा म्हणजेच दोन्ही फ्लॅटचे मूल्य ६९.७५ कोटी रुपये आहे. यापोटी सरकारला प्रत्येक फ्लॅटद्वारे १.०४ कोटी रुपये व दोन फ्लॅटमार्फत २.०९ कोटी रुपयांचा मुद्रांक महसूल मिळाला. याच टॉवरमधील त्याच माळ्यावरील ३३०१ व ३३०४ हे दोन फ्लॅट शैलेश दालमिया यांनी खरेदी केले. त्या प्रत्येक फ्लॅटची किंमत २७.५७ कोटी रु. अर्थात दोन फ्लॅटची एकूण किंमत ५५.१५ कोटी रुपये आहे. प्रत्येक फ्लॅटसाठी ८२.७३ लाख व दोन फ्लॅटसाठी १.६५ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क महसूल सरकारला मिळाला. हे दोन फ्लॅट प्रत्येकी २९६४ चौरस फुटांचे आहेत. सर्व चार फ्लॅटसाठी मिळून एकूण सहा गाड्यांचा राखीव तळ आहे.

९३ हजार ६०४ रु. प्रति चौरस फूट

या फ्लॅट खरेदीपोटी सरासरी ९३ हजार ६०४ रुपये प्रति चौरस फुटाचा दर के. रहेजा रिअॅल्टीने खरेदीदार दालमिया कुटुंबीयांना आकारला. ३७०२ चौरस फुटांच्या फ्लॅटसाठी ९४ हजार १९२ रु. तर २९६४ चौरस फुटांच्या फ्लॅटसाठी ९३ हजार १६ रुपये प्रति चौरस फुटाचा दर आकारण्यात आला.

Source link