मजूर कामगारांसोबत डब्बेवाल्यांनाही शासनाने आर्थिक मदत करावी – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

- Advertisement -

शफीक शेख : मुंबई दि. 21 – राज्यातील 12 लाख कामगारांना महाराष्ट्र शासनातर्फे रुपये 2 हजारांची प्रत्येकी मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.हा निर्णय स्वागतार्ह असून या मजूर कामगारांसोबत मुंबईतील 5 हजार डब्बेवाल्यांनाही शासनाने अर्थीक मदत स्वरूपात प्रत्येकी 2 हजार रुपयांची मदत करावी असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली आहे.
मुंबईतील डब्बावाला संघटने चे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी ना रामदास आठवले यांच्याशी संपर्क साधून मुंबईतील 5 हजार डब्बेवाल्यांनाही शासनाकडून 2 हजार रुपयांची मदत मिळवुन देण्याची मागणी केली आहे. डब्बेवाल्यांची मागणी योग्य असून त्यांच्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असल्याचे सांगत याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डब्बेवाल्यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याबाबत काळविणार असल्याचे आश्वासन ना रामदास आठवले यांनी दिले.
कोरोना प्रतिबंधासाठी राज्यात टाळेबंदी सुरू असल्याने मुंबईतील डब्बेवाल्यांचा रोजगार बुडाला असून गावी रेशन कार्ड असल्याने मुंबईत अडकलेल्या डब्बेवाल्यांची अवस्था बिकट असल्याने राज्य शासनाने त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी डब्बेवाल्यांच्या संघटनेने आपल्याकडे केली असून त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ना रामदास आठवले यांनी सांगितले आहे

- Advertisement -