Home बातम्या राजकारण मनसेला अवघ्या एका जागेवर यश

मनसेला अवघ्या एका जागेवर यश

0

मनसेला अवघ्या एका जागेवर यश

विधानसभा निवडणुकीत मनसेला अवघ्या एका जागेवर यश मिळाले आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे प्रमोद पाटील विजयी झाले आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचे रमेश म्हात्रे आणि प्रमोद पाटील यांच्यात अत्यंत अटी-तटीची लढाई सुरु होती.

प्रत्येक फेरीमध्ये चढ-उतार सुरु होते. अखेर पाच हजार मतांच्या फरकाने प्रमोद पाटील विजयी झाले आहेत. या एकमेव जागेचा अपवाद वगळता संपूर्ण राज्यात मनसेला कुठेही यश मिळालेले नाही. डोंबिवलीमध्ये मनसेचे मंदार हळबे यांनी सुरुवातीला आघाडी घेतली होती. पण नंतर ते पिछाडीवर पडले.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही मनसेने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही मनसेला जुन्नरच्या फक्त एका जागेवर विजय मिळाला होता. पण त्यानंतर त्या आमदाराने शिवसेनेते प्रवेश केला. २००९ मध्ये मनसेचे सर्वाधिक १३ आमदार निवडून आले होते.