महर्षी वाल्मिकी जयंती दिनी राजधानीत अभिवादन – महासंवाद

    - Advertisement -

    नवी दिल्ली, दि. २६ : रामायणाचे रचनाकार आणि आदिकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली.

    यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, उपअभियंता कुलदीप पाटील, उपअभियंता गंगवार,जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे,  व्यवस्थापक सारिका शेलार, प्रमोद कोलपते यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

    याप्रसंगी व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनकार्याचा व साहित्याचा परिचय करून दिला.

    0000000

     

    - Advertisement -