
मुंबई, दि. २७ : महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र जिओस्पेशिअल टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन सेंटर (महाजिओटेक), मुंबई येथे विविध पदांवर काम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अनुभवी व पात्र शासकीय अधिकाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये आस्थापना अधिकारी, लेखा अधिकारी आणि सहायक कक्ष अधिकारी या प्रत्येकी एका पदाचा समावेश असून, कंत्राटी किंवा सेवा करार पद्धतीने ही नियुक्ती करण्यात येणार आहे, असे व्यवस्थापकीय संचालक(महाजिओटेक) यांनी कळवले आहे.
महाजिओटेक ही कंपनी अधिनियमाच्या कलम ८ अंतर्गत नोंदणीकृत संस्था असून, महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने जिओ-स्पेशिअल तंत्रज्ञानाशी संबंधित सेवा आणि वैज्ञानिक माहिती पुरविण्याचे कार्य करते.
अर्ज करण्यास १५ दिवसांची मुदत
भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात, पात्रता निकष आणि अर्जाचा नमुना यासाठी नियोजन विभागाच्या www.plan.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत [email protected] किंवा [email protected] या ई-मेल वर सादर करावेत, असे महाराष्ट्र जिओस्पेशिअल टेक्नॉलॉजी अप्लिकेशन सेंटर (महाजिओटेक), मुंबई यांनी कळवले आहे.
0000
वंदना थोरात/विसंअ

WhatsApp