Home बातम्या महापौरपदी भाजपच्या गीता सुतार तर उपमहापौर पदी आनंदा देवमाणे विजयी

महापौरपदी भाजपच्या गीता सुतार तर उपमहापौर पदी आनंदा देवमाणे विजयी

0

सांगली :सांगली महानगरपालिकेच्या महापौर पदी भाजपच्या गीता सुतार तर उपमहापौर पदी भाजपचे आनंदा देवमाणे विजयी झाले आहेत. भाजपा विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी अशी लढत झाली होती. भाजपाच्या गीता सुतार आणि आनंदा देवमाणे यांना ४३ मते पडली. तर महापौर पदासाठी कॉंग्रेसच्या वर्षा निंबाळकर यांना ३५ आणि उपमहापौर पदासाठी योगेंद्र थोरात यांना ३५ मते मिळाली.