महाराष्ट्राच्या हिताचा सदैव विचार करणारे… राज ठाकरे यांना रितेश देशमुखनं दिल्या खास शुभेच्छा

महाराष्ट्राच्या हिताचा सदैव विचार करणारे… राज ठाकरे यांना रितेश देशमुखनं दिल्या खास शुभेच्छा
- Advertisement -


मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस. राज यांना नेतेमंडळी, कार्यकर्त्यांसोबतचं सिनेकलाकारांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता रितेश देखमुख यानं देखील राज यांच्यासोबतचे खास फोटो शेअर शुभेच्छा दिल्यात.

‘माय मराठीवर जीवापाड प्रेम करणारे, मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताचा सदैव विचार करणारे, युवकांचे प्रेरणा स्थान आणि माझे मित्र राज ठाकरे जी आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच मनोकामना’, या कॅप्शनसहीत रितेशनं राज यांच्यासोबतचा एक खास फोटो देखील शेअर केला आहे.


राज ठाकरे यांची विनंती
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं अभिष्टचिंतन करण्यासाठी दरवर्षी त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी कार्यकर्त्यांची रीघ लागते. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करू नये,’ अशी आग्रहाची विनंती त्यांनी केली आहे





Source link

- Advertisement -