महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभर सकाळी आठ वाजता शासकीय समारंभ – महासंवाद

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभर सकाळी आठ वाजता शासकीय समारंभ – महासंवाद
- Advertisement -

मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन १ मे २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभ सकाळी आठ वाजता एकाच वेळी आयोजित करण्यात येणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्क, दादर येथे राज्यपालांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन होणार आहे.

राजशिष्टाचार विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार विभागीय व जिल्हा मुख्यालयांवर संबंधित पालकमंत्री, मंत्री किंवा राज्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल. त्यानुसार ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, बीड – सुनेत्रा अजित पवार, नागपूर – चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे, अहिल्यानगर- राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे-पाटील, नंदुरबार – हसन सकिना मियालाल मुश्रीफ, सांगली- चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चु पाटील, नाशिक- गिरीश गिता दत्तात्रय महाजन, पालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक, जळगाव- गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील, अमरावती- बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील, यवतमाळ- संजय प्रमीला दुलीचंद राठोड, मुंबई शहर- मंगलप्रभात प्रेमकंवर गुमनमल लोढा, रत्नागिरी- उदय स्वरुपा रविंद्र सामंत, धुळे- जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल, जालना- पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे, नांदेड- अतुल लिलावती मोरेश्वर सावे, चंद्रपूर- डॉ.अशोक जनाबाई रामाजी वुईके, सातारा- शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई, मुंबई उपनगर- ॲड.आशिष मिनल बाबाजी शेलार, वाशिम- दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे, रायगड- आदिती वरदा सुनिल तटकरे, लातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले, सोलापूर- जयकुमार कमल भगवानराव गोरे, हिंगोली- नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ, गोंदिया- संजय सुशिला वामन सावकारे, छत्रपती संभाजीनगर- संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट, धाराशिव- प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक, बुलढाणा- मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील), सिंधुदुर्ग- नितेश निलम नारायण राणे, अकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर, कोल्हापूर- प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर, पुणे- माधुरी मिरा सतिश मिसाळ, गडचिरोली- ॲड.आशिष उमादेवी नंदकुमार जयस्वाल, भंडारा- योगेश ज्योती रामदास कदम, वर्धा- डॉ.पंकज कांचन राजेश भोयर आणि परभणी येथे मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर ध्वज फडकावतील.

मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी सका ७.१५ ते या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय ध्वजवंदन कार्यक्रम आयोजित करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा व विभागीय मुख्यालयांबरोबरच पोलीस, गृहरक्षक दले, नागरी संरक्षण दले आणि अग्निशमन दलांचे संचलन आयोजित करण्यात येणार असून शासकीय इमारतींवर विद्युत रोषणाई केली जाणार आहे.

ध्वजवंदनावेळी ‘वंदे मातरम्’, राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करण्यात येईल. या समारंभप्रसंगी राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांच्या कुटुंबियांना सन्मानाने निमंत्रित करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.

महाराष्ट्र दिनानिमित्त वृक्षारोपण, वक्तृत्व, निबंध, प्रश्नमंजुषा स्पर्धा, प्रभात फेऱ्या, सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन शासनाने केले आहे.

००००

बी.सी.झंवर/विसंअ

- Advertisement -