मानहानी प्रकरणातून आता कंगना रणौतला हवीए सवलत, मुंबई हायकोर्टात दाखल केली याचिका

मानहानी प्रकरणातून आता कंगना रणौतला हवीए सवलत, मुंबई हायकोर्टात दाखल केली याचिका
- Advertisement -


हायलाइट्स:

  • मानहानी खटल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रणौतने दाखल केली याचिका
  • मानहानी खटल्याप्रकरणातून ही सूट देण्याची केली कंगनाने मागणी
  • ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात दाखल केलाय मानहानीचा खटला

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत आणि वाद हे समीकरण रूढ झाले आहे. सातत्याने खळबळजन वक्तव्य केल्यामुळे कंगना नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकते. गेल्यावर्षी कंगनाने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात काही खळबळजनक वक्तव्य केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या जावेद यांनी कंगनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. परंतु या सुनावणीवेळी कंगना अनेकदा गैरहजर राहिली त्यामुळे कोर्टाने नाराजीदेखील व्यक्त केली होती. आता कंगनाने या खटल्या संदर्भात एक याचिका दाखल केली आहे.

पासपोर्ट प्रकरणी कंगनाला तातडीने दिलासा नाही

या प्रकरणी कंगनाच्यावतीने तिचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी याचिका दाखल केली आहे. त्यात तिने असे म्हटले आहे की, सिनेमाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने ती देशा- परदेशात असते. या खटल्याच्या सुनावणीसाठी तिला अनेकदा खूप लांबचा प्रवास करून यावे लागते. प्रॉडक्शन हाऊसचे देखील खूप नुकसान होते. त्यामुळे खटल्याच्या सुनावणीवेळी ती अनुपस्थित राहिली असता काही फरक पडत नाही. कंगनाच्यावतीने तिचे वकील सुनावणी वेळी हजर राहतील. त्यामुळे तिला अनुपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे.


दरम्यान, कंगनाने केलेल्या या याचिकेवर २७ जुलै रोजी सुनावणी केली जाणार आहे. जावेद अख्तर यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये कंगनाविरोधात खटला दाखल केला होता. कंगनाने जुलैमध्ये एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांच्यावर अनेक आरोप केले होते. त्यामध्ये जावेद बॉलिवूडमधील गटबाजीला प्रोत्साहन देतात आणि त्यांनी कंगनाला धमकीदेखील दिली होती, असे म्हटले होते.

आता कंगना रणौत केली देशाचं नाव बदलण्याची मागणी, इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

कंगनाची ही मुलाखत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर घेण्यात आली होती. एका तासाच्या या मुलाखतीमध्ये कंगनाने केवळ जावेद यांच्यावरच नाही तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवरही खळबळजनक आरोप केले होते. जावेद अख्तर यांना तर तिने ‘सुसाईड गँग’चे सदस्य असे संबोधले होते. कंगनाने केलेल्या या आरोपांविरोधात जावेद यांनी तिच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला.


कंगनाच्या कामाबद्दल सांगायचे तर ‘थलायवी’ हा तिचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारीत आहे. त्याशिवाय कंगना ‘धाकड’ सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात ती एजेंट अवनीची अॅक्शन भूमिका साकारणार आहे. त्याशिवाय ‘तेजस’या सिनेमातही ती काम करत आहे. यामध्ये तिने भारतीय हवाईदलातील फायटर पायलटची भूमिका साकारली आहे.





Source link

- Advertisement -