Home ताज्या बातम्या मुख्यमंत्री कार्यालय प्रमुख समन्वयक पदी शिवसेना आमदार आणि माजी मंत्री रविंद्र वायकर यांची नियुक्ती

मुख्यमंत्री कार्यालय प्रमुख समन्वयक पदी शिवसेना आमदार आणि माजी मंत्री रविंद्र वायकर यांची नियुक्ती

0

मुंबई : मुख्यमंत्री कार्यालय समन्वयक म्हणून शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाला कँबिनेट मंत्री पदाचा दर्जाही असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात अधिकृत परीपत्रक देखील काढलं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे सर्व आमदार आणि मंत्री यांचा मुख्यमंत्र्यांशी संपर्क उत्तम रहावा तसेच मुख्यमंत्री कार्यालयीन कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी आमदार रविंद्र वायकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रविंद्र वायकर यांची ओळख
– रविंद्र वायकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू.
– 4 वेळा मुंबई महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष.

 – 3 वेळा जोगेश्वरी विधानसभेचे आमदार.
– माजी गृहनिर्माण आणि उच्च तंत्र शिक्षण राज्य मंत्री.
– विधानसभा शिवसेना प्रतोद म्हणुनही कामकाज केलंय.